सातारा : वाई औद्योगिक वसाहती मधील आर्यन प्रीमियम ऑलिबँक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून एकाने कंपनीतील 17 लाख 65 हजार रुपये किमतीची साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रविंद्र पांडुरंग पोपळे रा. यादोगोपाळ सातारा यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पावशे रा. भुईंज, ता. वाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पावशे याने कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडले आणि त्यातील 17 लाख रुपये किमतीचे कन्वर्सेशन मशीन, दोन लाख रुपये किमतीचे वेल प्रेस मशीन, एक लाख 80 हजार रुपयांचे स्टिचिंग मशीन, चाळीस हजार रुपयांचा एअर कॉम्प्रेसर, 20 हजार रुपये किमतीचे कटिंग मशीन, दहा हजार रुपयांचे दोन एसी 35 रुपये किमतीची इलेक्ट्रिक शेगडी आणि पाच लाख रुपये किमतीचे फिनिश गुड मटेरियल असा 17 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.