मुंबई : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजप-मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीपर्व सुरू होणार असल्याचे दिसते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले. या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यापार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजप-मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच, त्यामागील मोठे कारण देखील समोर आले आहे. भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व आले आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेताना विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले होते. त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काल उत्तर देत सल्ला दिला. आणि आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला पोचले. त्यामुळे राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ होणार असे हे संकेत आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या एक तासांपासून चर्चा सुरू आहे. फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित होते. फडणवीस यांच्याबरोबर मोहित कंबोज आहेत. फडणवीस अन् ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचे माहिती आहे.
अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे. मनसे लोकसभेला नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर विधानसभा स्वबळावर लढवली होती. यात अमित ठाकरे यांचा माहीम मतदारसंघातून पराभव झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे महेश सावंत इथं विजयी झाले आहेत.