महाबळेश्वर शहरातील दत्त हौसिंग सोसायटी नजीक विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्‍यू

by Team Satara Today | published on : 27 July 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्वर शहरातील दत्त हौसिंग सोसायटी नजीक विहिरीवर मोटार बघायला गेलेल्या एकाचा शेवाळ्यावरून पाय घसरून पडल्यामुळे मृत्‍यू झाला.

संतोष वसंत कोंडाळकर (वय ४५, रा. दत्त हौसिंग सोसायटी, महाबळेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली. याबाबत संदीप लक्ष्मण कोंडाळकर यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संतोष कोंडाळकर हे रविवारी सकाळी विहिरीवर नेहमीप्रमाणे मोटार बघण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी घरी आले नसल्याचे पाहून त्यांच्या पत्नीने नातेवाईकांना फोन करून घरी परत आले नसल्याचे सांगितले. संदीप हे सहकाऱ्यांसह सोसायटीच्‍या विहिरीवर गेले असता त्यांना संतोष यांची चप्पल दिसून आली व दुसरी चप्पल विहिरीच्या पाण्यावर तरंगत होती. यानंतर त्‍यांनी नातेवाईकांना ही गोष्‍ट सांगितली.

आजूबाजूची पाहणी केली असता संतोष हे पाण्‍यात पडल्‍याची खात्री झाली. यानंतर सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख संजय मधुकर पारटे यांना पाचारण करण्‍यात आले. यानंतर लोखंडी आकड्याच्‍या मदतीने संतोष यांचा मृतदेह बाहेर काढल


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणच्या आठवडा बाजारात पथदिव्याचा खांब कोसळला; दोन शेतकरी गंभीर जखमी, भर गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ गोंधळ
पुढील बातमी
दिलेलं आश्वासन पाळा, नाहीतर देशव्यापी आंदोलन करु; कॉकरोच जनता पार्टीचा सरकारला अल्टीमेटम

संबंधित बातम्या