सातारा : सातारा शहरातील एक हार्डवेअर चे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह 52 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 ते 26 दरम्यान मोळाचा ओढा परिसरातील हरी ओम हार्डवेअर या सुनील किसन इंगवले रा. शाहूपुरी, सातारा यांच्या दुकानाच्या लॉक लावलेल्या पट्ट्या अज्ञात चोरट्यांनी कापून दुकानातून 5500 रुपये रोख व इतर सामान असा 51 हजार 900 रुपयांचा माल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करीत आहेत.