गोडोलीत मारहाण करून मोबाईल व रोकड लुटली

सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हादाखल

by Team Satara Today | published on : 24 September 2025


सातारा  : सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत गोडोली येथील प्रतापसिंह महाराज उद्यान येथे दि. २१ रोजी रात्री २.३० वाजता सलीम नूरमुहम्मद मुलाणी (वय ३२, रा. राधिकानगर, विलासपूर) याच्यावर मन्या सुर्वे, सोन्या पार्टे, बबलू पार्टे आणि सचिन अशा चौघांनी शिवीगाळ करत हाताबुक्यांनी व दगडाने मारहाण केली.

यावेळी त्यांनी मुलाणी याच्याकडील २० हजार रुपयांचा रिअलमी कंपनीचा मोबाईल, १ हजार ५०० रुपये रोकड असा एकूण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
पुढील बातमी
साताऱ्याच्या प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांचे सीमोल्लंघन

संबंधित बातम्या