सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी टेकडी, सदर बाजार कॅनॉलच्या कच्च्या रस्त्याच्या शेजारी विनोद विठ्ठल भांडवलकर रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 490 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.