सातारा : सरपंचांकडून अधिकार घेऊन गावचा कारभार बेकायदेशीरपणे चालविला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे महिला किंवा आरक्षित पदावरील सरपंचाकडून अधिकार घेऊन कारभार चालविणाऱ्या गावपुढाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
तर भाजपचे आ. प्रविण दटके (१३ मे २०२६), राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (२७ जुलै २०३०), भाजपचे रमेश कराड (१३ मे २०२६) आणि भाजपचे गोपीचंद पडळकर (१३ मे २०२६) यांचाही कार्यकाळ अद्याप बाकी आहे. हे सर्व विधानपरिषदेचे आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने निवडणूक आयोगाने विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
निवडणूक कार्यक्रम
१० मार्च, २०२५ : अधिसूचना जारी
१७ मार्च, २०२५ : अर्जासाठी अंतिम मुदत
१८ मार्च, २०२५ : अर्जांची छाननी
२० मार्च, २०२५ : अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत
२७ मार्च, २०२५ : मतदान व मतमोजणी
विशेषकरून, ज्या ठिकाणी महिला सरपंच कार्यरत आहेत, अथवा सरपंचपद आरक्षित असेल अशा ठिकाणी अधिकार सोपविताना हेतू प्रामाणिक असला पाहिजे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय किंवा अपवादात्मक परिस्थितीशिवाय अधिकार प्रदान करायचे नाहीत, तर नियमबाह्य अधिकाराचा वापर झाल्यास संबंधित पंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांवर ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद