नवी दिल्ली : भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडल्याने तिच्या सुखरुप पृथ्वीवापसीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दुसरीकडे तिच्या परत आणण्याची जबाबदारी इलोन मस्क यांच्यावर कंपनीवर सोपविण्यात आली आहे. साल 2025 मध्ये सुनीता विल्यम्स अंतराळातून परतणार आहे. अंतराळात अनेक अंतराळवीर यापूर्वी अनेक महिने राहून आलेले आहेत. आता सुनीता विल्यम्स जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. दुसरीकडे सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड नोंद झाला आहे. काय आहे हा विक्रम ते पाहूयात…
नासाच्या सर्वात अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ( ISS ) चे नेतृत्व सांभाळले आहे. ती दुसऱ्यांदा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची लीडर बनली आहे. स्पेस स्टेशनची कॅप्टन म्हणून निवड होण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. सुनीता एक अनुभवी अंतराळवीर असून तिचा अंतराळातील शानदार ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी साल 2012 मध्ये एक्स्पीडीशन 33 दरम्यान सुनीता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची लीडर बनली होती.
भारतीय मूळ असलेली सुनीता विल्यम्स आणि तिच सहकाही बुश विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग कंपनीच्या स्टारलाईन स्पेसक्राफ्टच्या पहिल्या क्रु फ्लाईटमध्ये स्वार होऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक गाठले होते. 8 दिवसांच्या मिशनवर गेलेल्या स्टारलायनर यानात बिघाड झाल्याने दोघे अंतराळवीर यांच्यी पृथ्वीवापसीला फेब्रुवारी 2025 पर्यंत वेळ लागू शकतो असे म्हटले आहे. एवढे महिने स्पेस ट्रॅव्हल्स करुनही सुनीता विल्यम्स यांचे अंतराळ प्रेम जराही कमी झालेले नाहीए. सुनीता म्हणतात की या जागी मला आनंद मिळतो. मला येथे रहायला आवडते.
सुनीता विल्यम्स यांच्यावर नवी जबाबदारी :
सुनीता विल्मम्स यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची ही जबाबदारी अधिकृत रित्या रशियन अंतराळवीर Oleg Kononenko यांनी सोपविली आहे. जे लवकरच पृथ्वीवर येण्याची तयारी करायला लागले आहेत. कमांडर झाल्याने आता सुनीता विल्यम्स यांना स्पेस स्टेशनवर होणाऱ्या सर्व मोठ्या एक्टीव्हीटी, ऑपरेशन्स आणि वैज्ञानिक संशोधनाची देखरेख करावी लागणार आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |