सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास वाय सी कॉलेज समोरून एक 22 वर्षीय युवती कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावातील राहत्या घरातून एक 70 वर्षीय वृद्धा घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.