सातारा : संभाजीनगर, सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निसर्ग कॉलनी, संभाजीनगर, सातारा येथील महिला त्यांच्या दुकानात असताना दोन अज्ञातांनी मोटरसायकल वरून येऊन पाठीमागे बसलेल्या एकाने दुकानात येऊन पेन घेण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीचे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून ते दोघेजण मोटरसायकल वरून पळून गेले आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.