सातारा : पाचवड, ता. वाई येथील एका घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून साठवून ठेवलेला 1 किलो 800 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ भुईंज पोलिसांनी जप्त केला. या पदार्थाची अंदाजे किंमत 37 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा पुलाजवळ राहणार्या किसन कणसे (वय 54) यांच्या घरामागील शेडमध्ये 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी पांढर्या पिशवीत पारदर्शक प्लास्टिकमध्ये हिरवी, सुकलेली पाने व गोळीसदृश पदार्थ आढळून आला. या पदार्थाला उग्र वास असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. पोलीस शिपाई आकाश कुंभार यांच्या फिर्यादीवरून किसन कणसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे पुढील तपास करीत आहेत.