सातारा : सातारा शहर तालुका पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान निगडी तर्फ सातारा गावच्या हद्दीत एका गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला संदीप सर्जेराव शिंदे (रा. वेणेगाव, ता. सातारा) हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 905 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत सातारा शहरातील जुना मोठा स्टॅन्ड येथील चिकन सेंटरच्या शेडच्या आडोशास जुगार घेताना राजेश संपतराव कदम (रा. शनिवार पेठ सातारा) हे आढळून आले. त्यांच्याकडून एक दुचाकी, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 55 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा शहरसह तालुका पोलिसांचे दोन जुगार अड्ड्यांवर छापे; दोन जणांविरोधात कारवाई
by Team Satara Today | published on : 30 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा