पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामात सुधारणा करणार

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली सचिव-अधिकाऱ्यांसमवेत बैठक

सातारा : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सडक योजनेच्या कामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिमंडळाच्या सचिव-अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शकता व गुणवत्ता पूर्ण कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी घेतलेल्या बैठकीत नामदार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकी बाबत आढावा बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतीश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी आदी उपस्थित होते.



मागील बातमी
सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील
पुढील बातमी
उपचारात हलगर्जीपणा, तरूणाचा मृत्यू

संबंधित बातम्या