राजकारणापलीकडची मैत्री हरपली, घटना मनाला धक्का देणारी : पालकमंत्री शंभूराज देसाई यांची अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

by Team Satara Today | published on : 28 January 2026


सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, स्पष्टवक्ता आणि नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता अशी दादांची ओळख होती. मी अडीच वर्षे वित्त विभागात त्यांच्यासोबत राज्यमंत्री म्हणून काम करताना पाहिले की, अर्थसंकल्प सादर करताना प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच त्यांची भूमिका असायची. आमची राजकारणापलीकडची मैत्री होती. या घटनेवर विश्वासच बसत नाहीये, हा मनाला मोठा धक्का आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे, अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

स्पष्टवक्ता, नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मी अडची वर्ष वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना त्यांच्या सोबत अनेक बैठका होत होत्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे ही त्यांची भूमिका राहील आहे. 

शंभूराज देसाई म्हणाले, माझी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकरणापलीकडची मैत्री होती. त्यांच्या जाण्याने अत्यंत दुख झाले असून पाटण विधानसभा मतदार संघाचा आमदार व सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री. देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अजित पवारांचे सरळ रेषेत उतरणारे विमान अचानक का वाकले?; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बिघाड की आणखी काही चर्चांना उधाण
पुढील बातमी
अजितदादांची एक्झिट प्रचंड मानसिक धक्का देणारी आहे. बोलायला शब्द उरले नाहीत - खासदार उदयनराजे भोसले

संबंधित बातम्या