सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने ट्रॅव्हलरची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 04 जेयू 4496 या क्रमांकाची ट्रॅव्हलर चोरुन नेली. ही घटना दि. 16 जुलै रोजी सदरबझार येथे घडली. याप्रकरणी शितल सचिन करपे (वय 41, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.