महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिव व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा  : वीरशैव लिगांयत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, समाजप्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करीता  महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार" देवून सन्मानित  करण्‍यात येते तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्था करीता   क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. तरी  जास्तीत जास्त व्यक्ती व समाजिक संस्थानी पुरस्काराचे प्रस्ताव 23 फेब्रुवारी पर्यंत सादर करावे.

अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी   सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूज येथे ‘अमृत फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु; प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन
पुढील बातमी
माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी संपर्क अभियानाचे आयोजन

संबंधित बातम्या