थकबाकीदार पाणी देयक ग्राहकांची नळजोडणी होणार बंद

थकबाकी भरण्याचे सातारा जीवन प्राधिकरणाचे आवाहन

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पाणी पुरवठा होणारे सर्व ग्राहकांना जाहीरपणे आवाहन करणेत येते की, ज्या ग्राहकांकडे ५००० हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी आहे अशा ग्राहकांनी थकबाकी त्वरीत भरावी. अन्यथा नळजोडणी बंद करणेची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात आली आहे. नळजोडणी बंद झाल्यास आपली गैरसोय होवु नये याची दक्षता घेवुन ग्राहकांनी आपली थकबाकी त्वरीत भरावी.

पाणी देयकाबाबत कोणाची कोणतीही तक्रार, शंका असल्यास त्वरीत कार्यालयात संपर्क साधुन त्याचे निराकारण करुन घ्यावे.अवैधरित्या कोणी पाणी वापर करत असल्यास नळजोडणी तात्काळ खंडीत करण्यात येईल.

मागील बातमी
स्थानिकांना हक्‍काच्‍या जमिनी देणारच
पुढील बातमी
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

संबंधित बातम्या