सातारा : भाजी विक्रीसाठी बसण्यावरून झालेल्या वादातून एका भाजी विक्रेत्यावर दगडाने हल्ला झाल्याची घटना सातारा शहरात घडली असून अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप विश्वनाथ माने (वय 53, रा. मंगळवार पेठ) हे 26 जुलै रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास मनाली बेकरी ते प्रकाश लॉज मार्गावर भाजी विक्री करत होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तेथे बसू नये, अशी दमदाटी केली. त्यानंतर दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. सातारा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलिस हवालदार कणसे करत आहेत.