शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवून मारामारी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा  : शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवून मारामारी करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

याप्रकरणी महिला पोलीस हवालदार माधुरी शिंदे यांनी फिर्याद दिली असून विष्णू सुनील काळे, जयश्री सुनील काळे, कमळ काळे, (तिघे रा. माजगावकर माळ झोपडपट्टी आकाशवाणी केंद्राजवळ, सातारा) तसेच दिनेश काफ्या काळे (रा. जरेवाडी) आणि सुप्रिया विशाल काळे (रा. त्रिपुटी ता. कोरेगाव जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वांनी एकमेकांना शाहूपुरी पोलीस स्टेशन समोर मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे. यामध्ये दिनेश काफ्या काळे याच्या डोक्यात विष्णू काळे यांने दगड मारून जखमी केले आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस नाईक यादव करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर परिसरात राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; एका विरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वर मंदिरालगत जुगार अड्ड्यावर छापेमारी

संबंधित बातम्या