सातारा : जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या चाईल्ड हेल्पलाइन कक्ष १०९८ च्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बालकाला मदतीचा हात देण्यात आला. दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ वर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित लोहमार्ग पोलिस अधिकारी व चाईल्ड हेल्प लाईन चे अधिकारी कर्मचारी यांनी तत्परतेने कार्यवाही केली.
सातारा रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाची सुरक्षितता व काळजी लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही बाल कल्याण समिती, सातारा यांच्या आदेशान्वये करण्यात आली. त्यानंतरे बालकाला पुढील देखभाल, संरक्षण व पुनर्वसनासाठी बालगृहात दाखल करण्यात आले. अडचणीत सापडलेल्या बालकांना मदत, संरक्षण आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. संकटात सापडलेल्या बालकांना वेळीच मदत मिळावी, यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून बालकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, व तसेच अशा प्रकारची बालके कोठेही आढळून आल्यास तातडीने 1098 चाईल्ड हेल्पलाइन कक्षास संपर्क करण्याचे आवाहन असे जिल्हा महिला व वाल विकास अधिकारी ज्योती लंगुटे यांनी केले.
एका कॉलवर बालकाला मिळाला आधार ! चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या तत्परतेमुळे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाला मदतीचा हात
by Team Satara Today | published on : 27 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा