१ मे पासून सातारा येथे विचारवेध व्याख्यानमाला सुरू !

दि.३० रोजी गीतमैफिलच्या कार्यक्रमाचे आयोजन

by Team Satara Today | published on : 24 April 2025


सातारा : विवीध सामाजिक  संघटना व संस्था यांच्यावतीने महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त गुरुवार दि.१ मे'पासून विचारवेध व्याख्यानमाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सभागृहात सुरू होत आहेत.दरम्यान,बुधवार दि.३० रोजी गीतमैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.३ अखेर दररोज सायंकाळी ६।। वा.आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम पुष्प गुरूवार दि.१ मे रोजी प्रमूख वक्ते कॅप्टन डॉ. राजशेखर निलोलू यांचे, "डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी कामगार विषयक धोरण" या विषयावर मार्गदर्शन होणार असून ऍड. रोजेंद्र गलांडे यांचे नविन सामाजिक सुरक्षा विषयक प्राथमिक मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थान सम्यक ज्येष्ट ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे भूषवणार आहेत.द्वितीय पुष्प शुक्रवार दि.२ मे रोजी लुम्बिनी संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.गोरख बनसोडे यांचे,"चक्रवर्ती सम्राट अशोक जीवन संघर्ष" या विषयावर प्रमुख व्याख्यान होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांचे, "महाबोधी महाविहार आंदोलन" या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष  ऍड.विजयानंद कांबळे भूषवणार आहेत.तृतीय पुष्प शनिवार दि. ३ मे रोजी प्रा. प्रदीप शिंदे यांचे, "क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे समग्र विचार" या विषयावर मार्गदर्शन होणार असून मच्छींद्र जाधव यांचे आजचे शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन होणार आहे.अध्यक्षस्थान गणेश कारंडे भूषवणार आहेत.व्याख्यान मालेच्या पूर्वसंध्येला बुधवार दि ३० रोजी भिमगीतांचा कार्यक्रम सादर होणार असून माणिक आढाव, माणिक कांबळे,यशपाल बनसोडे आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

तेव्हा सदरच्या कार्यक्रमास शहर व परीसरातील सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक,युवती,उपासक,उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे.असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती,भारतीय बौद्ध महासभा,सम्यक जेष्ठ नागरीक संघ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भिमाबाई आंबेडकरप्रतिष्ठान, संबोधी प्रतिष्ठान,धम्मशील चारिटेबल ट्रस्ट,परीवर्तन मित्र समुह,संत रोहीदास सामाजीक संस्था, बंधूत्व प्रतिष्ठान,तथागत फाऊंडेशन, रिपब्लिकन सेना आदी तत्सम संघटनांच्यावतीने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बुधच्या संतोष जगदाळेंचा मृत्यू
पुढील बातमी
फलटण-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात

संबंधित बातम्या