सातारा येथील ‘टीम जे. के. ए.’च्या खेळाडूंची पहिल्या ऑल इंडिया इंटर-स्कूल स्पर्धेसाठी निवड; जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

by Team Satara Today | published on : 18 August 2026


​सातारा :  जपान कराटे असोसिएशन (JKA) इंडियातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या 'जे. के. ए. इंडिया ऑल इंटर-स्कूल टूर्नामेंट'साठी सातारा येथील 'टीम जे. के. ए. सातारा'च्या  त्रिग्या सावंत, काव्या ठोके, समर्थ ठोके आणि ओजस्वी जक्का या चार गुणवंत खेळाडूंची निवड झाली आहे. 

ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दि. २१ ऑगस्ट ते २3 ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडणार असून, यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

​या स्पर्धेसाठी सातारच्या 'टीम जे. के. ए.' मधील त्रिग्या सावंत, काव्या ठोके, समर्थ ठोके आणि ओजस्वी जक्का या चार खेळाडूंची निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक विरेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत.

​राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाल्याबद्दल संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 'टीम जे. के. ए. सातारा'च्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन होत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मांढरदेवच्या विद्यार्थिनींचा ठाणे येथे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळ्यात सन्मान
पुढील बातमी
जावली तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत सूचना

संबंधित बातम्या