खंडोबा माळ परिसरात जुन्या वादातून चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : संभाजीनगर येथील खंडोबा माळ परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ज्योती सचिन देशमुख, नितीन अशोक देशमुख आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष गंगाराम शिंदे (रा. खंडोबा माळ, संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयितांनी लोखंडी कडे तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस कर्मचारी सपकाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मल्हार पेठ परिसरात किरकोळ वादातून कात्रीने हल्ला; एकावर गुन्हा
पुढील बातमी
सातार्‍यात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकींची चोरी

संबंधित बातम्या