शिवथर, आरळे येथील डीपी फोडून अज्ञातांनी केली 36 हजारांच्या तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 24 August 2026


सातारा : महावितरणच्या विद्युत यंत्रणेतील मौल्यवान तांब्याच्या साहित्यावर चोरट्यांची नजर पडली असून, शिवथर, आरळे येथील विद्युत रोहित्रातील तब्बल सुमारे 28 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. 

दि. 26 जुलै रोजी सकाळी अकरापूर्वी शिवथर येथील डीपी फोडून तांब्याची तार काढून नेण्यात आली. महावितरणचे कर्मचारी प्रवीण महादेव टोणपे (वय 37, रा. आरफळ, ता. जि. सातारा) यांनी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दुसर्‍या घटनेत, आरळे येथील डीपी मधून तांब्याची तार चोरीला गेल्याचे 16 जुलै रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आले. याबाबत वायरमन अमित लक्ष्मण कोळी (वय 35, रा. विकासनगर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार बोराटे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश; आणखी दोघे जेरबंद, तीन आरोपींकडून ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त
पुढील बातमी
सह्याद्री कॉलनी परिसरात जुन्या वादातून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या