ट्रॅक्टर-मोटारसायकच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 31 July 2025


कराड : ट्रॅक्टरला मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर- पुणे मार्गिकेवर नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. विश्वनाथ बाळासो पवार (वय ५०, रा. कासेगाव) असे एका जखमीचे नाव असून, दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही.

घटनास्थळावरील माहिती अशी, श्री. पवार हे त्यांच्या मित्रासमवेत कामानिमित्त कऱ्हाडला निघाले होते. कोल्हापूर मार्गिकेवर नांदलापूरच्या हद्दीत ते आले असता त्यांच्या दुचाकीने (एमएच १० ईजे ३८३१) समोरील ट्रॅक्टरला (एमएच ११ जी २८७९) पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरून दोघे जण महामार्गावर फेकले गेले. दोघांनाही डोक्याला मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अमृत बाबर, दस्तगीर आगा, सुनील कदम, राहुल कदम दाखल होत जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये बनावट सोन्याची बिस्किटे प्रकरणी ३ संशयितांना अटक
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन

संबंधित बातम्या