पालकमंत्र्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत, त्याला आम्ही काय करू?: ना. जयकुमार गोरे; आता राजकारण संपले, विकासाभिमुख राजकारणासाठी सर्वांना सोबत घ्यावे

by Team Satara Today | published on : 05 April 2026


सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने धमकी देत आहेत. त्यांना आपली लोकं नीट संभाळता येत नाहीत. त्याला आम्ही काय करू. आम्ही युतीचा धर्म पाळला आहे. सभापती निवडीमुळे भाजपाचे झेडपीत बहुमत सिध्द झाले. लढाई करण्याची त्यांंच्यात हिंमत नाही. आमच्याकडे 34 सदस्य होते. आमच्याकडे अ, ब, क असे तीन प्लॅन होते. प्लॅन ड बाहेर काढला असता तर आणखी वेगळे चित्र सभागृहात दिसले असते. आता राजकारण संपले आहे. विकासाभिमुख राजकारणासाठी सर्वांना सोबत घ्यावे, असे आवाहन ना. जयकुमार गोरे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर भाजप पदाधिकारी झेडपीत दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या दालनात आसनस्थ करण्यात आले.

यावेळी ना. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी सर्वांना बरोबर घेवून काम करावे. मिनी मंत्रालयातून मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आमचे वांदे कराल. झेडपीतील कॅमेरे बंद राहिले त्याची चौकशी अध्यक्षांनी करावी. सभापती व अध्यक्षांनी समिती नेमावी. आम्ही सीसीटीव्ही बंद केले नाहीत. सीसीटीव्ही सुरू असते तरीही या निवडणुकीत परिणाम झाला नसता, असेही ते म्हणाले.

यावेळी आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, जि.प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकजणांना गंडा घालणारा भामटा गजाआड; राजस्थान येथून अटक
पुढील बातमी
कोयना दौलत डोंगरी महोत्सवात खाद्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ना. शंभूराज देसाई यांनी खाद्य संस्कृतीचा घेतला आनंद

संबंधित बातम्या