वीरांगना प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात

महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; खेळात भाग घेऊन जिंकली भरघोस बक्षिसे

by Team Satara Today | published on : 12 October 2024


सातारा : नवरात्र उत्सवानिमित्त वीरांगना प्रतिष्ठान च्या वतीने होम मिनिस्टरचा कार्यक्रम बसवेश्वर भवन या हॉल वर संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळात सहभाग घेतला. भरघोष बक्षिसे जिंकून पैठणी व लेडीज सायकल मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.

कार्यक्रमाला सातारा शहरातील महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा गौरी आवळे, वरिष्ठ सल्लागार कांचन गगावणे, कार्याध्यक्षा दिपाली शिंदे उपस्थित होत्या. सादरकर्ते प्रितम लोखंडे यांनी विविध खेळ घेत महिलांचा उत्साह वाढविला. शायरी, उखाने घेत त्यांनी उत्तम सादरीकरण केले. तामजाईनगर येथील सरीता सकुंडे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांना मलबार ज्वेलर्सकडून पैठणी देण्यात आली. तर इतर महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. लकी ड्रॉ च्या माध्यमातून सारीका पंडीत यांना लेडी सायकल मिळाली. ही सायकल अमर सायकल मार्ट यांच्यावतीने देण्यात आली. तनिष्क फॉर्मिंग ज्वेलर्स यांनी 1 ग्रॅम पर्यंत वस्तू भेट दिली. व्रो फॅशन यांच्यावतीने खरेदीवर कुपन भेट देण्यात आले. मम़श्री फुड प्रोडक्टस् याच्या वतीने शेंद्रिय गुळातील लाडु चे वाटप करण्यात आले. घोडके सराफ, शिवेंद्रराजे भोसले मित्र समुह, चंद्रविलास हॉटेल, वाणी ब्युटी झोन यांनी महिलांना भेट वस्तू दिल्या. याप्रसंगी अश्विनी सुर्वे, द्वारका आवळे, मिनाक्षी मोरे, गीता पटेल, कोमल जगताप, निलम आवळे, दुर्वा अवघडे, विद्या गडकरी व महिला, युवती, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्र्याचे शेड उचकटून काजुचा माल व रोख रक्कम लंपास
पुढील बातमी
सातारा शहर पोलिसांची अप्रतिम कामगिरी

संबंधित बातम्या