जाब विचारल्याचा राग आल्याने एकाला मारहाण

by Team Satara Today | published on : 22 August 2024


सातारा : आमच्या घरातील बुट का चोरला ? याचा जाब विचारल्याचा राग आल्याने चौघांनी महिलेच्या पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना सदर बाजार येथे घडली. याप्रकरणी श्वेता प्रसाद शेलार वय 31 रा. सदर बाजार सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
इंद्रजीत कणसे, साहिल शितोळे, निखिल शितोळे, पालवी शितोळे यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने आमच्या घरातील शूज का चोरला, अशी विचारणा इंद्रजीत कणसे याला केली होती. त्याचा राग मनात ठेवून इंद्रजीत कणसे यांच्यासह इतर तिघांनी फिर्यादीचे पती प्रसाद साहेबराव शेलार वय 33 यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. पोलीस हवालदार एस. एस. शिंदे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खाजगी मिळकतीत प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला

संबंधित बातम्या