हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त धनिणीच्या बागेत अन्नदान व वृक्षारोपण; शिवसेनेकडून सामाजिक उपक्रम राबवून जन्मशताब्दी साजरी

by Team Satara Today | published on : 24 January 2026


सातारा  :  हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांची पहिली शाळा धननीची बाग येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या निवासी शाळेत सामाजिक उपक्रम राबवून जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेसाठी १०० किलो गहू, १०० किलो तांदूळ देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय शाळेच्या बगीच्यात फुलझाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी प्रशांत गुजर, शिवसेना सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत आणि तालुकाप्रमुख रमेशआण्णा बोराटे यांनी मनोगत व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक व राष्ट्रहिताच्या कार्याला उजाळा दिला.

यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक रविराज बडदरे, जिल्हा चिटणीस शैलेश बोडके, गणेश अहिवळे, विजय धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, समीर धुमाळ, रोहित जाधव, सुमित नाईक, अशितोष पारंगे, अथर्व पवार, पार्थ दाते, प्रसाद वाडकर सर, महेंद्र पाटील, गणेश जाधव, राहुल साळुंखे, संतोष जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - नितीन देशपांडे; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
पुढील बातमी
सोशल मीडियावर सातारा जिल्हा पोलीस दलाबाबत दिशाभूल करणारी, खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संबंधित बातम्या