कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याबद्दल एका युवकावर वाठार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमित रमेश लांडगे असे संबंधित युवकाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जुलै २०२२ ते सहा जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. पीडित मुलगी गर्भवती राहू नये म्हणून संशयिताने प्रत्येकवेळी तिला जबरदस्तीने गोळ्या खायला दिल्या. पीडित मुलगी येत-जात असताना तिचा दुचाकीवरून पाठलाग करून तिचा छळ केला. त्याबद्दल पीडित मुलीने तक्रार दिली असून, बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.