चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर चाकू हल्ला

by Team Satara Today | published on : 27 August 2025


कराड : चारित्र्याच्या संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. निता जाधव असे महिलेचे नाव आहे. तर शैलेंद्र नामदेव शेवाळे (रा. कोयना वसाहत, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. संबंधित महिला कराडातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला असताना तिची शैलेंद्रशी ओळख झाली. त्यानंतर सन 2007 पासून ही महिला तिच्या मुलांसह शेवाळेसोबत कोयना वसाहत परिसरात राहतात.

काही महिन्यांपासून शैलेंद्र चारित्र्याच्या संशयावरून निताला मारहाण करीत होता. सोमवारी दुपारी कपडे वाळत घालत असताना शैलेंद्र याने तिच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटले आणि तिला कोंडून निघून गेला. जखमी निताने या हल्ल्यची माहिती मुलांना दिली. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मतचोरीबद्दल काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक
पुढील बातमी
पित्ताशयात खडे झाल्यास आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचा सेवन

संबंधित बातम्या