सातारा : मातंग समाजाला शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याकरता सातार्यात मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 2 सप्टेंबर रोजी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये होत आहे. या बैठकीला मातंग समाजाचे आमदार अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन किशोर गालफाडे, कांतीलाल कांबळे, पप्पू कांबळे, सत्यवान कमाने, उमाकांत साठे यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये मातंग समाजाला येणार्या अडीअडचणींवर विशेष चर्चा केली जाणार आहे. मातंग समाजाचा केवळ इतर लोक वापर करून घेतात. त्यांना कुठल्या योजनेचे लाभ मिळत नाहीत, शासकीय योजनेचे लाभ त्यांना मिळवून देण्याकरता विशेष आराखड्याची रचना केली जाणार आहे. या बैठकीत आमदार अमित गोरखे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. मातंग समाजाच्या वतीने गोरखे यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दिनांक 2 रोजी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक उमाकांत साठे, सचिन कांबळे, सागर वायदंडे, राज सोनावले, जगन्नाथ कवळे, सिताराम भवाळे, अनिकेत गायकवाड यांनी केले आहे.
मातंग समाजाच्या प्रगतीसाठी बैठकीचे आयोजन
आमदार यशवंत गोरखे यांचा 2 रोजी होणार सत्कार
by Team Satara Today | published on : 29 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा