आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन वर्षे तडीपारीचे आदेश असतानाही खुलेआमपणे सातार्‍यात फिरत असताना यश सुभाष शिंदे (वय 19, रा.मोळाचा ओढा, सातारा) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सदरबझार येथे 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी केली. पोलिसांनी त्याच्यावर तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. ना. मोहिते करीत आहेत.


मागील बातमी
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव 21 ते 23 फेब्रुवारी करणार जिल्हा दौरा
पुढील बातमी
खोट्या गुन्ह्याच्या धमकीने रोख रकमेसह दागिण्याची चोरी

संबंधित बातम्या