जगन्नाथ रथयात्रेत तीन हत्ती अचानक बिथरले

चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण; भविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 27 June 2025


अहमदाबाद: अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू आहे. या रथ यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. अहमदाबादमध्ये रथयात्रा सुरू असतानाच तीन हत्ती अचानक बिथरले आणि उधळले. तीन हत्ती अचानक बिथरले असल्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

रथयात्रेत तीन हत्ती बिथरले असल्याने गोंधळ उडाला. मात्र काही काळाने त्या ठिकाणची निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आली. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसले तरी भविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अहमदाबाद येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेत 17 हाती सामील झाले होते.

हे 17 हत्ती यात्रेत सहभागी झाले होते. त्यामधले तीन हत्ती अचानक बिथरले आणि नियंत्रणाबाहेर गेले. हत्ती बिथरलेले पाहून भविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. भाविक इकडे तिकडे पळू लागले. परिस्थिती पाहता वन विभगाच्या पथकाने तीनही हत्तींवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त केले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अहमदाबाद येथे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली होती. या यात्रेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यांनी सकाळी भगवान जगन्नाथ यांची विधिवत पूजा केली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे समूह व अदानी फाउंडेशनचा करार
पुढील बातमी
पंचम ग्रुप आयोजित मुग्धा वैशंपायनची आश्वासक मैफिल

संबंधित बातम्या