कौटुंबिक वादातून सावत्र भावाला भोसकले

by Team Satara Today | published on : 26 June 2025


कराड : कौटुंबिक वादातून एकाने सावत्र भावाला चाकूने भोसकल्याची घटना गोळेश्वर (ता. कराड) येथील दुपटे कॉलनीत काल सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी जखमी राहुल पोपट दुपटे (वय ३४) यांनी याबाबतची फिर्याद दिली असून, त्यावरून दयानंद पोपट दुपटे (वय ४५), आदित्य दयानंद दुपटे (वय २०), शीतल दयानंद दुपटे (वय ३६) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी, गोळेश्वर येथे राहणाऱ्या राहुल दुपटे यांनी काल सायंकाळी त्यांच्या सावत्र भावाची पत्नी शीतल दुपटे हिच्याकडे सामाईक बंद खोलीच्या कुलपाची चावी मागितली. चावी न दिल्यामुळे राहुल यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल यांचा सावत्र भाऊ दयानंद दुपटे याने चाकूने राहुल यांना भोसकले.

शीतल व आदित्य या दोघांनी राहुल यांना मारहाण केली. राहुल यांची आई कल्पना दुपटे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्या हातावरही चाकूने वार केले. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’
पुढील बातमी
नवी मुंबई विमानतळावर लागणार यूजर शुल्क

संबंधित बातम्या