सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शाहूपुरी चौक ते माळवाडी रस्त्यावर संकल्प कॉलनी शाहूपुरी, सातारा येथील नवीन पूल बांधणीचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील रस्ता व शाहुपूरी नळ पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
या बांधकामामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शाहूपुरी भागाकरिता पाणी पुरवठा करण्यात येणारी ३५० मि.मी. व्यासाची डी.आय. प्रकारची मुख्य अशुध्द जलदाबनलिका येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईपलाईन स्थलांतरीत करण्याबाबत प्राधिकरणाकडे तगादा लावलेला आहे. त्या अनुषंगाने दि. २२ ते दि.२४ या कालावधीमध्ये पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचे काम करणार असून शाहूपुरी चौक ते माळवाडी हा रस्ता बंद राहणार आहे. तसेच दि.२३ ते दि.२४ या कालावधीमध्ये शाहूपुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तरी पर्यायी रस्त्याचा वापर करावा व उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.