सातारा : विटीदांडू हा खेळ आपल्या देशाचा प्राचीन, पारंपरिक खेळ असून , विटी दांडू खेळाचे जनक स्व.प्रशांत नवगिरे सर यांनी आधुनिक पद्धतीने मैदानाची आखणी करून हा खेळ नियमात बसवून खेळला जाईल याची व्यवस्था केली , विटीदांडू खेळासाठी नियम तयार करण्यात आले असून नियम पुस्तिका सुद्धा प्रसारित करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात आणि भारतासाहित जवळजवळ एकवीस देशांमध्ये विटीदांडू हा खेळ स्पर्धा स्वरूपात खेळला जातो, आता पर्यंत या खेळाच्या जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत
विटीदांडू खेळला मिळत असलेला जनाधार पाहता या खेळाला राजाश्रय मिळावा आणि शालेय खेळ स्पर्धेत(स्कूल गेम) विटी दांडू या खेळाचा समावेश व्हावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस, आणि विटीदांडू गिल्लीडंडा असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विकास गोसावी आणि ऑल इंडिया विटीदांडू गिल्लीडंडा असोसिएशनचे प्रभारी सचिव गौरव नवगिरे यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली