महागाव येथे मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

by Team Satara Today | published on : 19 January 2026


सातारा : नालसा (ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा) योजना २०१६,  ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी ३. सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि केंद्र/राज्य सरकारच्या योजना या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, मातोश्री वृद्धाश्रम महांगाव, कोरेगाव रोड, सातारा येथे करण्यात  आले होते. 

या  कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य शंकरराव भगत, डॉ. चंद्रकांत नलवडे उपस्थित होते. 

श्रीमती बेदरकर  यांनी नालसा (ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर सेवा) योजना २०१६ आणि सार्वजनिक उपयुक्तता सेवा आणि केंद्र, राज्य सरकारच्या योजना या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

 श्री. भगत यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. नलवडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड काढण्यासाठी नोंदणी केली. तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कायदेविषयक माहितीपत्रके वाटप करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जीएसटी-२.० अंतर्गत व्यापाऱ्यांनी ग्राहकांना दर कापातीचा लाभ द्यावा - राज्यकर सहायुक्त कार्यालय
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते; संचलनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम

संबंधित बातम्या