01:12pm | Oct 07, 2024 |
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) या पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. या पक्षाकडून काेणाला उमेदवारी दिली जाणार यावर बरेच चित्र अवलंबुन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुण्यातील हडपसरचे चेतन तुपे आणि वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघाचे सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांची साथ सोडली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरारोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. तर खडकवासला आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. खडकवासला मतदारसंघात केवळ अडीच हजार मतांच्या फरकाने सचिन दोडके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांनी आमदार माधुरी मिसाळ यांना कडवी झुंज दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपात आमदार तुपे यांचा हडपसर आणि टिंगरे यांचा वडगांवशेरी मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. महायुतीत या दोन्ही जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून पर्वती मतदारसंघाची मागणी : तसेच पर्वती, पुणे, कॅंटॉन्मेंट, शिवाजीनगर, कसबा, कोथरुड, खडकवासला हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येऊ शकतात, असे साधारण चित्र आहे. तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हडपसर, वडगांवशेरी, खडकवासला, पर्वती हे चार मतदार संघ तर काँग्रेसला पुणे कॅंटॉन्मेंट, कसबा आणि शिवाजीनगर हे मतदार संघ तर ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ कोथरुड हा मतदारसंघ मिळू शकतो. काँग्रेसकडून पर्वती या मतदारसंघाची मागणी आहे. तर शिवसेना हडपसर, वडगांव शेरी मतदारसंघासाठी आग्रही आहे.
पर्वतीमधून जाधव, खडकवासल्यातून दोडकेंचे जोरदार प्रयत्न : पुण्यातील आठ पैकी दोन ठिकाणी विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तेथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून कोण उमेदवार दिले जाणार यावर बरेच चित्र अवलंबून आहे. हडपसरमधून प्रशांत जगताप यांच्या तर वडगांव शेरीमधून माजी आमदार बापू पठारे किंवा त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांची नावे आघाडीवर आहेत. तर पर्वतीमधून अश्विनी जाधव, खडकवासल्यातून सचिन दोडके हे जोरदार प्रयत्न करीत आहेत. हडपसर,वडगांव शेरी या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र पाहण्यास मिळेल. हे दोन मतदारसंघ कोण राखणार यावरच दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. तर खडकवासलातील विजय कसा सुकर करता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रयत्न करावे लागतील.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |