सातारा : सातारा तालुका पोलिसांनी दमदार कारवाई करत चोरीला गेलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यात चार दुचाकी चोरीला गेल्याबाबतचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी संबंधित चोरट्यांना तात्काळ ताब्यात घेण्याबाबतच्या सूचना सातारा तालुका डीबी पथकाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने चोरीस गेलेली वाहने तीन संशयित इसम विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील पोलीस हवालदार दादा स्वामी यांना मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने लिंब, ता. सातारा या ठिकाणाहून तीन संशयितांना एका दुचाकीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता संबंधितांनी चार दुचाकींची चोरी करून घेऊन गेल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत एक लाख दहा हजार रुपये असून हे चोरीचे गुन्हे सातारा तालुका पोलिसांनी उघड केले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस हवालदार दादा स्वामी, शिखरे, महिला पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, धीरज पारडे यांनी सहभाग घेतला.