नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आणले जाण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला जेपीसी समिती स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. शेवटी हे विधेयक संसदेत आणले जाईल आणि ते मंजूर होईल. यापूर्वी रामनाथ कोविंद यांच्या समितीने एक देश, एक निवडणूक यासंबंधीचा अहवाल सरकारला सादर केला होता. सध्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी निवडणुका होतात. हे विधेयक कायदा झाल्यानंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांपासून ‘एक देश एक निवडणूक’ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने निवडणुकी जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन दिले होते. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या बाजूने कौल दिला. त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. अखेर या बैठकीत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ कायद्याला बैठकीत मान्यता देण्यात आली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीत आठ सदस्य होते. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, डीपीए नेते गुलाब नबी आझाद, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांचा समावेश होता. तसेच पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के.सिंग, लोकसभेचे माजी सरचिटणीस डॉ. सुभाष कश्यप आणि संजय कोठारी हे समितीचे सदस्य होते. तर मोदी मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन मंजुरी दिल्यामुळे यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक येण्याची शक्यता आहे.
आता या संदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची (जेसीपी ) स्थापन करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात. तसेच सतत निवडणूक प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे विकास कामांना खिळ बसतो. परंतु ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे खर्च वाचेल आणि विकास कामेही गतिमान होतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |