फिजिओथेरपिस्टना विविध ठिकाणी मोठ्या संधी

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 24 September 2025


कराड : विकसित राष्ट्रांमध्ये फिजिओथेरपीला मोठी मागणी आहे. अलीकडच्या काळात भारतातही फिजिओथेरपीबद्दल जागृती होत असून, येत्या काळात फिजिओथेरपिस्टना विविध ठिकाणी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांनी केले.

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने कराड येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून फिजिओथेरपी उपचारांबाबत जनजागृती केली. कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि सातारा जिल्हा फिजिओथेरपी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथील श्री दैत्यनिवारणी मंदिर परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

आ.डॉ. भोसले म्हणाले, नागरिकांना उच्च दर्जाची फिजिओथेरपी उपचार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी कृष्णा फिजिओथेरपी कॉलेज काम करत आहे. यान, शिबीरापूर्वी कृष्णा फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. दत्त चौकातून सुरु झालेल्या या रॅलीचा समारोप श्री दैत्यनिवारणी मंदिर परिसरात करण्यात आला. या रॅलीतून फिजिओथेरपीचे महत्त्व, सुदृढ जीवनशैली, नियमित व्यायामाची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शिबिरामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी, व्यायाम मार्गदर्शन, वृद्धत्वामुळे होणार्‍या तक्रारींवर फिजिओथेरपी उपाय याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शिबिरात अस्थिसंबंधी विकार, न्यूरोलॉजिकल समस्या, हृदयरोग, तसेच कामकाजातील त्रास यावर तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टांनी मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्तीबाबत वैयक्तिक सल्लाही घेतला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. वरदाराजुलू, डॉ.एस.आनंद, डॉ. सूरज कणसे, डॉ. संदीप शिंदे, डॉ. धैर्यशील पाटील, डॉ.ओंकार सोमदे, डॉ. नम्रता कदम, डॉ. प्रगती पाटील, डॉ. तृप्ती यादव, डॉ. तेजश्री कुंभार,डॉ.मयुरेश शहा, डॉ. श्रद्धा मोहिते,डॉ. स्मिता कणसे, डॉ. राधिका चिंतामणी, डॉ. सत्यम बोधाजी, सौ. स्वाती पिसाळ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
नमो नेत्र संजीवनी अभियानात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे होणार उपलब्ध

संबंधित बातम्या