सातारा : कडेपूर, जि. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी यशवंत निवृत्ती चव्हाण (मंत्री) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते दादा या नावाने परिचित होते.
यशवंत चव्हाण यांनी शेतकरी कुटुंब सांभाळताना आपली मुले उच्च शिक्षित करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरवून गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला. स्व. यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून नाव साधर्म्यामुळे त्यांना गावात मंत्री या टोपण नावाने ओळखले जावू लागले. रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण, कृष्णा महाविद्यालय शिवनगरचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख चंद्रकांत चव्हाण, दै. ‘पुढारी’ साताराचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, दै. ‘पुढारी’ कराड कार्यालयातील उपसंपादक अमोल चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, चेअरमन डॉ. योगेश जाधव, दै.‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, दै.‘पुढारी’चे निवासी संपादक हरीश पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, ‘पुढारी’च्या कराड कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे, सांगली जि.प.चे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, अजित साळुंखे यांच्यासह सातारा, कराडमधील पत्रकार बांधवांनी व मान्यवरांनी यशवंतदादा यांना श्रद्धांजली वाहून चव्हाण परिवाराचे सांत्वन केले.