शिवसेना व धनुष्यबाण घराघरात पोहचलेय आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वत्र भगवा फडकला पाहिजे -सौ. रेश्मा जगताप

by Team Satara Today | published on : 13 February 2026


सातारा :  शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हयाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सातारा जिल्हयात शिवसेना वाढलीच पाहिजे आणि ती साहेबांनी दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. जिल्हयात महिलांचे संघटन बळकट केले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालावरून घराघरात शिवसेना व धनुष्यबाण पोहचले आहे. आता आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वत्र भगवा फडकला पाहिजे, अशा सूचना जिल्हा संपर्कप्रमुख रेश्मा जगताप यांनी व्यक्त केल्या.  

सातारा जिल्हा शिवसेना कार्यालय येथे आयोजित महिला आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी मोरे, तालुका प्रमुख विद्या बर्गे, पौर्णिमा चोरगे, प्रियांका चोरगे, स्वप्नाली चोरगे, स्नेहल मोरे, आरती ढोणे यांच्यासह जिल्हातील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी जगताप यांनी महिलाकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

बैठकित त्यांनी महिलांना साताऱ्यातील महिला बांधणी बळकट करण्याच्या सूचना केल्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुका व आताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक यातील बदल त्यांनी महिलांना पटवून दिला. महिला घरातून बाहेर पडून घर टू घर प्रचार केला कि बदल नक्की घेतो. हा इतिहास आहे. जिल्हयात शिवसेनेला जिल्हा परिषदेवर १५ जागांवर तर त्याच्या डबल म्हणजे २९ पंच्यात समिती जनावर विजयी झाला आहे. त्यामुळे साताऱ्याला आता बदल हवा असल्याचे जगताप यांनी सांगितले.

यापुढे आता ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होतील त्यामुळे महिलांनी शिवसेनेचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या शासकीय योजना घर टू घर पोहोचवा अशा सूचना दिल्या. यापुढे महिला घटना वाढवणार आहे. बचत गट, उद्योग या माध्यमातून त्यांचे आर्थिक बळकटीकरण करणे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना व त्यांच्या कुटुबाला मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्याऱ्यांनी कामे करा महिलांना विविध स्तरावरील समित्यांमध्ये सामावून घेऊन अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्याऱ्यांना दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेच्या मैदानात नागरिकांची स्वयंस्फूर्तीने विशेष स्वच्छता मोहीम; धनंजय जांभळे, धनंजय कदम, राहुल साबळे, रवी पवार यांचा पुढाकार
पुढील बातमी
जिल्हयाच्या हितासाठी सर्वपक्ष मिळून सर्वसमावेशक निर्णय घेणे गरजे - पालकमंत्री भूराज देसाई; : सातारा शहर संघटनेच्यावतीने तलवार भेट

संबंधित बातम्या