पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक अन् अमित शहा ॲक्शन मोडमध्ये

by Team Satara Today | published on : 13 March 2025


नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जबाबदारी स्वीकारत असा दावा केला आहे की ट्रेनमध्ये 214 पाकिस्तानी सैनिकांसह एकूण 426 प्रवासी होते. वृत्तानुसार, आतापर्यंत 60 सैनिक मारले गेले आहेत, तर 150 अजूनही ओलीस आहेत. दरम्यान पाकिस्तानच्या बलुच प्रांतात ट्रेन हायजॅक झाल्याची घटना घडली आहे. मात्र त्यानंतर आता भारत देखील सतर्क झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील संघटनांवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ आणि ‘अवामी कृती समिती’ या दोन संघटनांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंट वर याबद्दल माहिती दिली आहे. या संघटना लोकांना भडकावण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, असे अमित शहा यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ आणि ‘अवामी कृती समिती’ वर बंदी घातल्याच्या निर्णयावर मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुफ्ती यांनी अशा प्रकारे बंदी घालणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. या सामाजिक-राजकीय संघटना आहेत. भारत सरकार मिरवाईजची प्रतिष्ठा समजून घेते आणि त्यांना झेड सुरक्षा देते आणि नंतर तुम्ही त्यांच्या संघटनेवर बंदी घालता, हे अत्यंत चुकीचे आहे.

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण करण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जबाबदारी स्वीकारत असा दावा केला आहे की ट्रेनमध्ये 214 पाकिस्तानी सैनिकांसह एकूण 426 प्रवासी होते. पाकिस्तानी लष्कराने ही कारवाई संपल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान 21 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून चार निमलष्करी दलांचे जवान मारले गेले. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व ३३ बंडखोरांना ठार केले.

सशस्त्र दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल शरीफ यांनी दिली. ते म्हणाले की, मंगळवारी बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सचे चार जवानही शहीद झाले. लेफ्टनंट जनरल शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने प्रत्युत्तर देत सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि ओलिसांची सुखरूप सुटका केली.

बलुचिस्तान प्रांतात बीएलएने ट्रेनचे अपहरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तथापि, गेल्या वर्षी संघटनेने प्रांतातील विविध भागात सुरक्षा दल, आस्थापना आणि परदेशी नागरिकांवर हल्ले तीव्र केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
होळीच्या दिवशी चाहता महिलांनी हर्षवर्धनला दिल्या शुभेच्छा
पुढील बातमी
पाण्याची मोटर चोरणारा जेरबंद

संबंधित बातम्या