खंडणीसह जबरी चोरी प्रकरणी 13 जणांवर गुन्हा

सातारा : अवैध धंदा सुरु करण्यासाठी खंडणी मागून खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी 13 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरात मोळाचा ओढा येथे बंद पडलेला मटका व्यवसाय पुन्हा सुरु कर आणि त्याची मंथली पंचवीस हजार रुपये दे, अशी खंडणीची मागणी करत एका गँगने दोन जणांना मारहाण केली. मारहाणीनंतर त्या गँगने चालू महिन्याचा हप्ता म्हणून खिशातून चार हजार रुपये घेवून गेले. ही घटना दि. 3 रोजी दुपारी 4.30 वाजता घडली असून त्या गँगच्या 13 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाशवाणी झोपडपट्टी येथील प्रशांत बापूराव वायदंडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन तो पानटपरीचा व्यवसाय करतो. सुरज उंबरकर, सागर उंबरकर (दोघे रा. मोळाचा ओढा), रेहान शेख, राहुल धबधबे (दोघे रा. तेलीखड्डा), निरंजन सोनार (ऱा. शुक्रवार पेठ) याच्यासह सहा ते सात जण अशा 13 जणांनी बंद केलेल्या मटका, जुगाराचा धंदा पुन्हा सुरु करुन अमोल वज्जाक याला महिन्याला 25 हजार रुपयांचा हप्ता दे, किंवा या ठिकाणी पान शॉप चालवायचे असेल तर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये दे, असे म्हणाले. त्यास नकार दिला असता प्रशांत वायदंडे व त्याचा मित्र अल्ताफ जब्बार शेख या दोघांना लाथाबुक्कांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर तेरा जणांनी चालू महिन्याचा हप्ता म्हणून प्रशांतच्या खिशातले 4 हजार रुपये काढून घेतले. त्यावरुन त्या गँगच्या 13 जणांवर खंडणीचा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.



मागील बातमी
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
दहशतीचा प्रयत्न केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या