सातारा : नदीपात्रात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी सकाळी साडेनऊ ते बारा वाजण्याच्या दरम्यान पांडुरंग दादासो जाधव (रा. रामकृष्ण नगर, सातारा) यांचा वेणेगावच्या शेताकडे नदी ओलांडून जात असताना नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
नदी ओलांडून जात असताना नदीपात्रात बुडल्याने रामकृष्ण नगर येथील एकाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा