सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सुनील शंकरराव प्रभूदेसाई रा. गोडोली, सातारा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.