साताऱ्यात रामनवमी पारंपारिक उत्साहात; राम जन्म काळासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

by Team Satara Today | published on : 26 March 2026


सातारा  : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या श्रीराम मंदिरांमध्ये रामनवमी आणि त्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने हजेरी लावली .राम जन्म आणि जपनाम सोहळा तसेच पंचसूक्त राम यण यासारख्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित रामनवमी सोहळ्याला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

सातारा शहरातील बोरा राम मंदिर रामाचा गोट येथील काळाराम मंदिर, शहरातील विविध राम मंदिरे तसेच चिमण पुरात पेठेतील संस्कृत प्राधान्य शाळेत रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतापगंज पेठ येथील श्री गोराराम मंदिरात श्री रामचंद्र देवांचा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उत्सवानिमित्त चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी दरम्यान आध्यात्म रामायण पारायण, पंचसूक्त पवमान अभिषेक, महापूजा तसेच रामनाम जप यज्ञ सुरू आहे. दररोज सायंकाळी भजनी मंडळांचे सादरीकरण, स्तोत्र पठण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गुरुवारी (दि. २६ मार्च) सकाळी १०.३० वाजता श्रुती प्रभुणे (जोशी) यांचे रामजन्म कीर्तन झाले. दुपारी १२.३९ वाजता श्रीराम जन्म सोहळा व पालखी उत्सव साजरा केला. सायंकाळी संतोष वाघ व सहकलाकार यांचा गीतरामायण व भक्तीगीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजित  करण्यात आले असून त्यास प्रतिसाद मिळाला आहे.

उत्सव काळात रामरक्षा स्तोत्र पठण (दि. १९ ते २७ मार्च) व दररोज रात्री महाआरती होत आहे. शुक्रवारी (दि. २७ मार्च) प्रतापगंज पेठ भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम दर्शन व पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आगटे कुटुंबीयांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भैरवनाथ यात्रेनिमित्त परवानगी नाकारूनही लिंब येथे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम; आयोजकांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात भागीदारीमधील ट्राडेन्ट फिटनेस नावाची जिम दुसऱ्यास विकून फसवणूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या