श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात

‘आई उदे ग अंबे उदे’च्या जयघोषाने अवघी औंधनगरी दुमदुमूली

by Team Satara Today | published on : 15 January 2025


औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्या औंध येथील श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ‘आई उदे ग अंबे उदे’च्या जयघोषाने अवघी औंधनगरी आज दुमदुमून गेली होती.

यावेळी गणेश इंगळे, हेमंत हिंगे यांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन डराया सेठना यांच्‍या हस्‍ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदांच्‍या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत आली. गायत्रीदेवी यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी भूमी इराणी, सोनिया गोरे, मुस्तफा पाटणकर, स्वाती अरिंगळे, ऋषभ ओसवाल, ऋषिकेश बोबडे, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, जितेंद्र पवार, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, तहसीलदार बाई माने, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, शाकिर आतार, शंकरराव खैरमोडे, आब्बास आत्तार, प्रशांत खैरमोडे, दीपक नलवडे, गणेश देशमुख, अमर देशमुख, उपअभियंता संजय खोत, शशिकांत मोरे, नवल थोरात, यशवंत देशमुख, रमेश चव्हाण, प्रदीप कणसे, संजय निकम, दीपक कर्पे, गणेश चव्हाण, संतोष भोसले, धनाजी आमले, शैलेश मिठारी, इलियास पटवेकरी, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते उपस्‍थित होते. त्यानंतर श्री यमाई देवीच्या रथोत्सवास उत्साही मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री यमाईदेवीचे दर्शन घेऊन रथावर एक रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या माळा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले व आई उदे ग अंबे उदेचा जयघोष केला. यावेळी रथाच्या अग्रभागी डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आराधी, घडशी या देवीच्या सेवेकऱ्यांनी वेगवेगळ्या पेहरावात देवीच्‍या चरणी सेवा, कला सादर केली.

श्री यमाई, श्री निवास विद्यालयाचे लेझीम, झांज पथकाने प्रात्यक्षिके सादर केली. रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारुती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळ्यावर नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशिरा पद्माळे तळ्यामध्‍ये देवीस अभिषेक करून पूजन करण्यात आले. हा रथोत्सव सोहळा सुमारे सहा तास चालला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्काराबाबत मोठा निर्णय
पुढील बातमी
मुलांना वाचलेलं लक्षात राहत नाही

संबंधित बातम्या